Sunday, June 16, 2013

मन वढाय वढाय - बहिणा बाई चौधरी

 

सुशिक्षित अणि ज्ञानी ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत ही वस्तुस्थिति बहिणा बाई दाखवून जातात. निसर्ग अनेक प्रकारे आपल्याला धडे शिकवत असतो, आपणंच ते बघण्यात कमी पडतो. कही गोष्टी अजरामर का होतात हे अशा ओळी वाचल्यावरच कळु शकतं.

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । 
किती हकला हकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा ।
जशा वाऱ्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ।
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर ।
आरे इचू साप बरा, त्याले उतारे मंतर  ।।

मन पाखरू पाखरु, त्याची काय सांगू मात? ।
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ।।

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात ।
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत? ।।

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं? ।
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ।। 

भगवानदास माहौर (स्मृतिदिन १२ मार्च १९७९)

में विद्रोही हूँ उत्पीड़क सत्ता को ललकार रहा हूँ  खूब समझता हूँ में खुद ही अपनी मौत पुकार रहा हूँ  मेरे शोणितकी लालीसे कुछ तो लाल धरा हो...