Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts

Sunday, June 16, 2013

मन वढाय वढाय - बहिणा बाई चौधरी

 

सुशिक्षित अणि ज्ञानी ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत ही वस्तुस्थिति बहिणा बाई दाखवून जातात. निसर्ग अनेक प्रकारे आपल्याला धडे शिकवत असतो, आपणंच ते बघण्यात कमी पडतो. कही गोष्टी अजरामर का होतात हे अशा ओळी वाचल्यावरच कळु शकतं.

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । 
किती हकला हकला, फिरी येतं पिकांवर ।।

मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा ।
जशा वाऱ्यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।

मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन ।
उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।

मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर ।
आरे इचू साप बरा, त्याले उतारे मंतर  ।।

मन पाखरू पाखरु, त्याची काय सांगू मात? ।
आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।

मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर ।
तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।

मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।
मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ।।

देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात ।
आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत? ।।

देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं? ।
कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ।। 

Tuesday, February 12, 2013

जन पळभर म्हणतिल हाय हाय


जन पळभर म्हणतिल हाय हाय !
मी जाता राहिल कार्य काय?

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल, 
तारे आपुला क्रम आचरतिल, 
असेच वारे पुढे वहतिल
होईल काही का अंतराय?

मेघ वर्षतिल, शेते पिकतिल, 
गर्वाने या नदया वाहतिल,
पुन्हा कळजि की न उमटतिल,
पुन्हा तटावर हेच पाय?

सखेसोयरे डोले पुसतिल, 
पुन्हा आपुल्या कामी लगतिला,
उठतिल, बसतिल, हसुनी खिदळतिल,
मी जाता त्यांचे काय जाय?

अशा जगस्तव काय कुढावे,
मोही कुणाच्या का गुंतावे?
हरिदुता का विन्मुख व्हावे?
का जिरावुनाये शांतित काय?

Wednesday, December 26, 2012

ती गेली तेव्हा रिमझिम... - ग्रेस



माझ्या सर्वाधिक आवडत्या गाण्यांपैकी हे एक गाणं. कविता अणि चाल ह्या अश्या काही एकरूप झाल्या आहेत की आपण नेमक कश्यानी धुंद होतो, तेच कळेनासं होत.


ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता 

ती आई होती म्हणुनी, घन व्याकुळ मी ही रडलो 
त्या वेळी वारा सावध, पचोळा उडवित होता 

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे 
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता 

Tuesday, January 10, 2012

जीव रंगला - जोगवा




One of the boldest songs Marathi Films has seen till date. I love everything about this song, its tune, lyrics, singers and yes, the video... Absolutely subtle and gives the perfect glimpse of the movie its featured in! For those of you who haven't seen the movie, its definitely a "must watch". 

p.s: It's sad to see inhibitions, superstitions and traditions disgrace human species even in the 21st century!

Wednesday, April 6, 2011

कणा - कुसुमाग्रज


"ओळखलत का सर मला" -- पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.
क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून:
"गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून
माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतीत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी - बायको मात्र वाचली --
भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले
प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले --
कारभारणीला घेऊन संगे सर, आता लढतो आहे
पडकी भिंत बांधतो आहे. चीक्खल गाळ काढतो आहे" --
खिश्या कडे हात जाताच हसत हसत उठला
"पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला --
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठी वरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा."

भगवानदास माहौर (स्मृतिदिन १२ मार्च १९७९)

में विद्रोही हूँ उत्पीड़क सत्ता को ललकार रहा हूँ  खूब समझता हूँ में खुद ही अपनी मौत पुकार रहा हूँ  मेरे शोणितकी लालीसे कुछ तो लाल धरा हो...